‘मविआ’तील लोकसभेच्या जागावाटपावर ठाकरे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य? थेट सांगितलं कधी होणार जागावाटप
VIDEO | आगामी काळात लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार आणि मविआ ताकदीनं लढणार! कुणी केला दावा?
मुंबई : पुण्यातील लोकसभेच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जोरदार जुंपली आहे. पुण्याच्या जागेवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेच्या जागांविषयी मोठं भाष्य केलं आहे. ‘मविआ’तील लोकसभेच्या जागावाटपाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेच्या जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणतेही वाद नसून चाचपणी केल्यानंतर तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते जागावाटप करणार असल्याचे सांगितले. आता प्रत्येक पक्ष आपापल्या जागा तपासून बघत असून काँग्रेसकडूनही त्यांच्या 48 जागांची चाचपणी करुन पाहण्यात आहे. तर महाविकास आघाडी आणि आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकांबाबत विश्वास व्यक्त करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा त्यांनी संदर्भ देत सांगितले की, अजित पवार यांनी सांगितलं होतं की, महाविकास आघाडी आगामी काळातील निवडणुका ताकदीने लढणार असल्याचेही खैरे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असं वृत्त आले आहे. त्यामुळे जरी या निवडणुका एकत्र आल्या तरी त्या आम्ही जोमाने लढणार असल्याचे सांगत निवडणुका एकत्र आल्या तरी काही हरकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
Published on: May 30, 2023 11:55 AM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
