Special Report | महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही पण निर्बंध कोणते लागणार?
क्वॉरंटाईन कालावधी किती दिवसांचा असावा इथपासून ते लॉकडाऊन लावावा की लावू नये आदींबाबत आज मोठे निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधला.
मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. क्वॉरंटाईन कालावधी किती दिवसांचा असावा इथपासून ते लॉकडाऊन लावावा की लावू नये आदींबाबत आज मोठे निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधला. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता केवळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही तर अँटिजेन टेस्टवर आपण भर देणार आहोत. अँटिजेनच्या टेस्ट वाढवाव्या लागतील. अँटिजेन टेस्ट किट खरेदी केली तर त्याचा हिशोब जिल्हा प्रशासनाला कळवला पाहिजे. अँटिजेनमध्ये किती पॉझिटिव्ह होतात याचा रेकॉर्ड ठरवला पाहिजे. त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत, असं टोपे यांनी सांगितलं.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

