Kolkata | सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?
कोलकाता येथे तृणमूल काँग्रेस (टीएमसी)च्या कार्यालयावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील हॉग मार्केट परिसरात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेसीबीच्या सहाय्याने टीएमसी कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांनी बुलडोजर चालवत ही कारवाई केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून केला जात आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महुआ मोइत्रा आणि डेरेक ओ’ब्रायन यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर पुन्हा एकदा राजकीय संघर्ष तीव्र होत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत असून, या प्रकरणी अधिकृत चौकशीची मागणीही केली जात आहे. मात्र स्थानिकांकडून वेगळाच दावा करण्यात येत आहे. संबंधित जागा मूळतः एका दुकानदाराची असून ती बळकावून तिथे अनधिकृतपणे युनियनचे कार्यालय उभारण्यात आले होते, असा आरोप काही नागरिकांनी केला आहे.
या प्रकरणामुळे कोलकात्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर....
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी...