संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना लोकसभेसाठी प्रचार करता येणार नाही, कारण…

| Updated on: Apr 17, 2024 | 3:21 PM

पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि चिमूर याठिकाणी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. त्यामुळे आजचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस रॅली, सभा आणि मिरवणुकीने गाजणार आहे.

Follow us on

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. मात्र आज संध्याकाळी ६ वाजेनंतर उमेदवारांना आपला प्रचार करता येणार नाही. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि चिमूर याठिकाणी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. त्यामुळे आजचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस रॅली, सभा आणि मिरवणुकीने गाजणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपुरात भाजपचे नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत होणार आहे. चंद्रपुरात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्या चुरशीची लढत होताना दिसणार आहे. भंडाऱ्यात सुनिल मेंढे विरूद्ध प्रशांत पडोळे, रामटेकमध्ये राजू पारवे विरूद्ध श्यामकुमार बर्वे यांच्या लोकसभेचा सामना रंगणार…. बघा व्हिडीओ