पदवीधर निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस, यासह जाणून घ्या दिवसभरातील मोठ्या बातम्या

हर्षदा शिनकर, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 28, 2023 | 8:39 AM

शेवटच्या दिवशी सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील प्रचाराचा धुराळा बघायला मिळत असून नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा जाहीर करणार का?

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून 30 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीस भाजपची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे समोर आले आहे. तर शेवटच्या दिवशी सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील प्रचाराचा धुराळा बघायला मिळत असून नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा जाहीर करणार का? याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी पत्र पाठवणार, कसबा आणि चिंचवडबाबत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले असून मोठ्या भेटीगाठीही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील कसबा पेठ पोट निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांना आज दुपारपर्यंत अर्ज पाठवण्याच्या सूचना असून मुलाखतीनंतर उमेदवार ठरण्यात येणार आहे. तर कसबा पोट निवडणुकीसाठी भाजपकडून केंद्रीय निवड समितीला ५ नावांचा प्रस्ताव देण्यात आला असून यामध्ये शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांच्या नावांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.

सी व्होटर्सच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीला लोकसभेत ३४ जागा मिळणार असल्याचे समोर आले असून सी व्होटर्सच्या सर्वेवरून ठाकरे आणि शिंदे गटात एकच खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या मोठ्या घडामोडी

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI