उद्या ग्रामसभा घेऊन आंदोलनासंदर्भात निर्णय घेणार – अण्णा हजारे

किराणा दुकानात वाईन विक्रीविरोधात अण्णा हजारे चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी राळेगणसिद्धीमध्ये येऊन अण्णांची भेट घेतली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Feb 12, 2022 | 10:51 PM

अहमदनगर : राज्य सरकारकडून किराणा दुकानांमध्ये (grocery storesवाईन विक्री (Wine sales) करण्याची परवानगी देणयात आली आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी देखील वाईन विक्रीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आता राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह या राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाल्या. त्यांनी जवळपास तासभर अण्ण हजारे यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीनंतर अण्ण हजारे यांनी आपण 50 टक्के समाधानी असल्याचे म्हटले आहे. सध्या तरी आपण उपोषणावर ठाम आहोत. उद्या ग्रामसभा घेऊन निर्णय घेऊ, सरकारने लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी यावेळी दिली आहे. मात्र दुसरीकडे अण्णा हजारे हे पूर्णपणे समाधानी असल्याचा दावा नायर यांनी केला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें