TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 11 June 2021

पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. | Sharad Pawar Prashant Kishor

पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी येतील. या भेटीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आगामी काळात महाविकासआघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवेल, असे म्हटले होते. त्यामुळे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.