TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 September 2021

पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगरमध्ये अशाच प्रकारची संतापजनक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील उक्कडगावच्या महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण व अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगरमध्ये अशाच प्रकारची संतापजनक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील उक्कडगावच्या महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण व अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सरपंच महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. महिला सरपंचाला मारहाणीच्या लागोपाठच्या घडलेल्या घटनांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून महिला सरपंचावरील मारहाणीविरोधात आवाज उठवला आहे. ही मारहाण करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि गुंडशाहीचा धुडगूस थांबवण्यात यावा, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे. महिला सरपंचाने व्हिडीओमधून गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या गुंडांनी आपल्याला लाथ मारली व शिवीगाळ केली, असे महिला सरपंचाने व्हिडीओमध्ये म्हटले असून आरोपींविरोधात कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली आहे. त्यांनी ग्रामसभेत आलेला वाईट अनुभव व्हिडीओमधून कथन केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI