VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 29 September 2021
नाशिकमध्ये पावसाचे थैमान थांबता थांबत नाही. मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस अजूनही बरसत आहे. नांदगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, कळवणला धुवाधार पावसाने झोडपेल आहे. नद्या-नाले दुथडी भरले आहेत.
नाशिकमध्ये पावसाचे थैमान थांबता थांबत नाही. मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस अजूनही बरसत आहे. नांदगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, कळवणला धुवाधार पावसाने झोडपेल आहे. नद्या-नाले दुथडी भरले आहेत. नांदगावमध्ये पांझण नदीच्या पुलावरून नीलेश परदेशी (वय 31) हा तरुण वाहून गेला आहे. तालुक्यातील बोलठाणसह इतर गावांचा पाण्यामुळे संपर्क तुटला आहे. दिंडोरीतील गणेश गुंबाडे (वय 22) या तरुणाचा पालखेडच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. शेतातल्या टोमॅटोवर फवारणी केल्यानंतर गणेश अंघोळीसाठी कालव्यात उतरला. कालव्यातून बाहेर निघताना लोखंडी रॉडचा धक्का लागल्याने तो पुन्हा कालव्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला

