AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणी खोके खाल्ले? हे ही 2 दिवसात स्पष्ट करू - दिपक केसरकर का म्हणाले? पहा टॉप 9 न्यूज

कुणी खोके खाल्ले? हे ही 2 दिवसात स्पष्ट करू – दिपक केसरकर का म्हणाले? पहा टॉप 9 न्यूज

| Updated on: Oct 15, 2022 | 9:54 PM
Share

आमच्या सरकारमध्ये कोणतीही अस्थिरता नसून स्वत: अजित पवार हेच अस्वस्थ आहेत. त्यामुळेच अजित पवार असे म्हणत आहेत. आम्ही हे सरकार पुर्ण काळ चालवू,राज्यात पुन्हा निवडून येऊ असेही फडणवीस म्हणाले.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा राजकीय गेम केला असे गायकवाड म्हणाले. तर बाळासाहेब असतानाच उद्धव ठाकरे यांनी कार्याध्यक्ष होण्यासाठी खेळी केल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकार अस्थिर असल्याचे भाकीत केले. त्यांच्या या भाकीतानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना उत्तर दिलं आहे. तसेच आमच्या सरकारमध्ये कोणतीही अस्थिरता नसून स्वत: अजित पवार हेच अस्वस्थ आहेत. त्यामुळेच अजित पवार असे म्हणत आहेत. आम्ही हे सरकार पुर्ण काळ चालवू,राज्यात पुन्हा निवडून येऊ असेही फडणवीस म्हणाले. तर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडताच चंद्रशेखर बानवकुळे यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी वरळीच्या समुद्रात मशाल विझवायची आहे. तर तर बारामतीत घड्याळ आणि साकोलीत पंजा थाबवायचा असल्याचे म्हटलं आहे. तर 50 खोके एकदम ओकेच्या शिवसेनेच्या घोषणेवर उत्तर लवकरच देऊ असे शिंदे गटाच्या दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तर कुणी खोके खाल्ले? हे ही 2 दिवसात स्पष्ट करू असेही केसरकर म्हणाले.

 

Published on: Oct 15, 2022 09:54 PM