TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 03 October 2022 -TV9

खासदार रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे अमित शाहांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी खडसेंना शाहांनी त्यांच्या ऑफिसबाहेर 3 तास बसवल्याचंही महाजन म्हणाले.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Oct 03, 2022 | 10:19 AM

मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत मोठा खूलासा केला आहे. एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांची भेट आपल्या समोर घेतली होती. तर फडणवीस, तुम्ही आणि मी बसून जे काही असेल ते मिटवून घेऊ असे खडसेंनी म्हटल्याचं महाजन म्हणाले. तसेच खासदार रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे अमित शाहांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी खडसेंना शाहांनी त्यांच्या ऑफिसबाहेर 3 तास बसवल्याचंही महाजन म्हणाले. दमदाटी करणाऱ्यांची सत्ता जाणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तर आमची सत्ता कधी येईल हे कळणारही नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनो कोणत्याही दबावाला बळी पडू नका, कारण नसताना चुकीचं कामं करू नका. दिवस हे बदलत असतात, असे पवार म्हणाले. शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. तसेच आपण हस्तक्षेप केला असता तर शिंदे गटाचाच दसरा मेळावा तेथे झाला असता असेही शिंदे म्हणाले.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें