Mira Bhayandar : मुंबईत मनसेविरोधात व्यापारी संघटना एकवटल्या; जोरदार घोषणाबाजी अन् आंदोलन
Mira Bhayandar Protest Against MNS : मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटना मनसेच्याविरोधात एकवटलेल्या आहेत.
मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटना एकवटलेल्या आहेत. मनसेकडून दुकानदाराला झालेल्या मारहाणीनंतर आता व्यापारी संघटनांकडून मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. जोरदार घोषणाबाजी करत सगळे व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत.
व्यापारी संघटना मनसेविरोधात आक्रमक झालेली आहे. कारवाईची देखील मागणी केली जात आहे. बंदची हाक देखील आता व्यापाऱ्यांनी दिलेली आहे. अशाप्रकारे एखादी भाषा न बोलण्याने मारहाण करणं चुकीचं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यापऱ्यांकडून दिली जात आहे. तसंच आज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद देखील पाळण्यात येत आहे. दरम्यान, जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाने मराठी भाषा बोलण्याची गरज काय, असे वक्तव्य केले होते. त्यावरुन मनसेचे कार्यकर्ते त्याला जाब विचारायला गेले होते. तेव्हा देखील या दुकान मालकाचा मराठी न बोलण्याचा हेका कायम होता. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी या दुकान मालकाला मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता व्यापारी संघटना आक्रमक झालेल्या आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

