Hemangi kavi | शिर्डी ड्रेसकोडच्या वेळेस हेमांगी कवी कुठे होती? तृप्ती देसाईंचा सवाल

अभिनेत्री हेमांगी कवी आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडच्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या? मला माहित नाही, असा टोलाही देसाईंनी लगावला.

प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ (Hemangi Kavi) सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टवरुन सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इंदुरीकर महाराज कीर्तनातून महिलांविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा कुठे होता? असा सवाल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. अभिनेत्री हेमांगी कवी आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडच्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या? मला माहित नाही, असा टोलाही देसाईंनी लगावला.

हेमांगी कवी काय म्हणाली?

आम्ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहोत. अनेक वेळा आम्हाला ट्रोल केलं जातं, आम्ही सोशल मीडियावर कसं यावं, कसं बाहेर पडायवं हे आता समाज ठरवणार का? मी विदाऊट मेकअप गलिच्छ दिसते, असं देखील मला म्हटलं जातं. माझा सोशल मीडिया आहे, मला ठरवू द्या, मी कसं समोर यायचं. मेकअप करणे, अभिनय करणे हा माझा जॉब आहे. तो माझ्या कामाचा भाग आहे.  पण मी माणूस आहे, मला प्रेशराईज केलं जातं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI