AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुटुंब नियोजन किटमध्ये चुकीचं काहीच नाही : Trupti Desai

कुटुंब नियोजन किटमध्ये चुकीचं काहीच नाही : Trupti Desai

| Edited By: | Updated on: Mar 21, 2022 | 12:52 PM
Share

कुटुंब नियोजनाच्या कीटचे भूमाता ब्रिगेड (Bhumata Brigade) संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. आशा वर्कर्स पुढे व्हा आणि कुटुंबनियोजनाच्या कामाला लागा, असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई (Trupti Desai) म्हणाल्या आहेत.

कुटुंब नियोजनाच्या कीटचे भूमाता ब्रिगेड (Bhumata Brigade) संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. आशा वर्कर्स पुढे व्हा आणि कुटुंबनियोजनाच्या कामाला लागा, असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई (Trupti Desai) म्हणाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने (Government of Maharashtra Public Health Department) कुटुंब नियोजन (Family planning) किटमध्ये ग्रामीण भागांमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी जर रबरी लिंग दिले असेल तर चुकीचे काहीच नाही. आशा वर्कर्सनेसुद्धा संकुचित विचार बाजूला ठेवून कुटुंबनियोजन करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये पुढाकार घेऊन अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवण्याची आता गरज निर्माण झाली आहे. आम्ही हे कसे दाखवू, ग्रामीण भागातील महिला काय म्हणतील, असा जर आपण संकुचित विचार आता एकविसाव्या शतकात करत बसलो तर कुटुंब नियोजनाच्या गप्पा हवेतच राहतील.

Published on: Mar 21, 2022 12:52 PM