राज्यात आजपासून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. नागपूरमध्ये पार 43 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे, तर चंद्रपूर्णमध्ये रेकॉर्ड ब्रेक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून, त्यानंतर विदर्भात देखील पावस होऊ शकतो असे हवामान विभागेने म्हटले आहे.