AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant Attack : उदय सामंत हल्लाप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक

Uday Samant Attack : उदय सामंत हल्लाप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक

Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 03, 2022 | 10:20 AM
Share

हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली. मंगळवारीच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील कात्रजमध्ये सभा होती. दरम्यान या प्रकरणात काही लोकांना अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पुणे : उदय सामंत हल्ल्याप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी संजय मोरे यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात (PUNE) मंगळवारी हल्ला झाल्याची घटना घडली होती. कात्रज परिसरात हा हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली. विशेष म्हणजे मंगळवारीच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील कात्रजमध्ये सभा होती. दरम्यान या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता  वर्तवण्यात येत आहे. हा हल्ला शिवसैनिंकाकडून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेतली आहे. दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Published on: Aug 03, 2022 10:20 AM

Follow Us