Uday Samant Video : भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा बडा नेता देवेंद्र फडणवीसांना भेटला? प्रत्युत्तर देत उदय सामंतांचा मोठा दावा

Uday Samant Video : भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा बडा नेता देवेंद्र फडणवीसांना भेटला? प्रत्युत्तर देत उदय सामंतांचा मोठा दावा

| Updated on: Jan 20, 2025 | 3:14 PM

'शिंदे साहेबांची स्थिती सध्याच्या राजकारणात इतकी बिकट आहे. मी शब्द वापरला, तर चुकीचा अर्थ निघेल. पण आता शिंदे साहेबांची गरज संपली का? आणि ते बाजूला व्हावेत, मला भिती वाटते की, उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं. आता शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल.' असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं.

उद्धव ठाकरेंना संपवलं आता एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवीन ‘उदय’ पुढे येईल, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक वक्तव्य केलं. यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत मोठा दावा केलाय. ‘मी आणि एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झालेत आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झालेले आहात. त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचा षडयंत्र आपण खेळू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना किती वेळा भेटलात याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे’, असा मोठा दावा उदय सामंत यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, मी कधीही वैयक्तिक बदनामी करत टीका करत नाही. परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी अस. फालतू षडयंत्र कोणी करू नये.  जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे खोटं असून ते निषेध करण्यासारखं आहे. त्याचा मी निषेध करतो आणि मी एकनाथ शिंदेंबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या-ज्या वेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी सोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही. यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाही, असं म्हणत उदय सामंतांनी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे.

Published on: Jan 20, 2025 03:14 PM