Udayanraje Bhonsle | मित्रांसोबत सिनेमागृहात,पुष्पा चित्रपटाच्या प्रेमात; उदयनराजेंनी लुटला आनंद

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा : द राईज' या सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरमध्ये मित्रांसमवेत जाऊन पुष्पा हा चित्रपट पाहिला.

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले  पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र कारण वेगळं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पा : द राईज  हा चित्रपट साताऱ्याच्या राजलक्ष्मी थिएटरमध्ये जाऊन पाहिला. उदयनराजे भोसले यांच्यासोबत काही मित्र आणि कार्यकर्ते देखील चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते. पुष्पा चित्रपट खासदार उदयनराजे भोसले यांना आवडला असल्यानं सातारकरांमध्ये या सिनेमाची चर्चा आहे. साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा : द राईज’ या सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरमध्ये मित्रांसमवेत जाऊन पुष्पा हा चित्रपट पाहिला. थिएटरमध्ये जाऊन फिल्म पाहण्याची उदयनराजेंची ही पहिलीच वेळ नाही तर याआधी देखील अनेक चित्रपट थिएटरमध्ये जावून पाहिले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI