खासदार उदयनराजे भोसले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. साताऱ्यातील (satara) विकास कामांच्या अनुषंगाने ही भेट होती.
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. साताऱ्यातील (satara) विकास कामांच्या अनुषंगाने ही भेट होती. या भेटीत अजित पवार यांनी उदयनराजे यांनी मांडलेले साताऱ्यातील अनेक प्रश्नांचा फोनाफोनी करून तिथल्या तिथे निकालही लावला. मात्र, बऱ्याच दिवसानंतर दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याने या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या भेटीनंतर उदयनराजे भोसले काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उदयनराजे मीडियासमोर येताच तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर उदयनराजे यांनी सर्वपक्षीय समभाव अशी सूचक प्रतिक्रिया देऊन सर्वांना बुचकळ्यात पाडलं. त्यामुळे उदयनराजे खरंच राष्ट्रवादीत जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.
Published on: Feb 05, 2022 01:41 PM
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

