AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udayanraje Bhonsle Ajit Pawar Meet : उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यात पुण्यात बैठक, कोणत्या मुद्यावर चर्चा?

खासदार उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुणे येथील सर्किट हाऊसमध्ये बैठक सुरु असल्याची माहिती आहे. अजित पवार आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीमुळं राजकीय चर्चांना वेग आला आहे.

Udayanraje Bhonsle Ajit Pawar Meet : उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यात पुण्यात बैठक, कोणत्या मुद्यावर चर्चा?
अजित पवार उदयनराजे भोसले
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 1:47 PM
Share

पुणे: खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhonsle) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात पुणे (Pune) येथील सर्किट हाऊसमध्ये बैठक सुरु असल्याची माहिती आहे. अजित पवार आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीमुळं राजकीय चर्चांना वेग आला आहे. अजित पवार कोरोना आढावा बैठकीच्या निमित्तानं पुणे येथील सर्किट हाऊसमध्ये उपस्थित आहेत. यावेळी खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या काही सहकाऱ्यासोबत पुणे येथे अजित पवार यांना भेटण्यासाठी दाखल झाले. अजित पवार यांची कामानिमित्त भेट घेत असल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिल्याची माहिती आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यामध्ये पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये बैठक सुरु असल्याचं कळतंय. खासदार उदयनराजे भोसले यांनी काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळं ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे हे समोर आलेलं नाही.

पुण्यात भेट 

खासदार उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यात पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीत नेमक्या विषयांवर चर्चा सुरु आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या भेटीची जोरदार चर्चा सुरु झाल्याचं कळतंय.

कामानिमित्त आल्याची उदयनराजे भोसले यांची माहिती

अजित पवार यांच्या भेटीला कामानिमित्त आल्याचं उदयनराजे भोसले यांनी माध्यमांना सांगितलं. या भेटीमुळं राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलंय. उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादीत एकत्रितपणे काम केलं आहे. उदयनराजे भोसले सध्या भाजपमध्ये आहेत.

विकासकामांच्या निमित्तानं भेट?

खासदार उदयनराजे भोसले यांनी काल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीत सातारा (शेंद्र)- कागल महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामानिमित्त ही भेट झाली होती. सहापदरीकरणाच्या कामासाठी नितीन गडकरी यांनी निधीला मंजुरी दिल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली होती.

पाहा व्हिडीओ:

साताऱ्याच्या राजकारणावर चर्चा?

खासदार उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील बैठकीत साताऱ्याच्या राजकारणावर देखील चर्चा होण्याची शक्यता बोललं जात आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलमध्ये उदयनराजे भोसले यांचा समावेश करत त्यांना बिनविरोध विजयी करण्यात आलं होतं. त्यानंतर प्रथमच उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्या बैठक होत आहे. आगामी काळात सातारा नगरपालिकेची निवडणूक देखील आहे. त्या निवडणुकीवर देखील आजच्या भेटीचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

इतर बातम्या: 

Video | कुडाळच्या डबलबारीत वाजलं #Srivalli! श्रोते म्हणाले, वाह बुवा एक नंबर…

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात Jio Network Down, त्रांत्रिक कारणांमुळे कॉलिंग, इंटरनेट सेवा ठप्प

BJP MP Udayanraje Bhonsle and Ajit Pawar meeting at Pune no reason revealed

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.