मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात Jio Network Down, तांत्रिक कारणांमुळे कॉलिंग, इंटरनेट सेवा ठप्प

गेल्या तासाभरापासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जियोचं (Reliance Jio) नेटवर्क ठप्प आहे. 12.15 वाजल्यापासून जिओचं नेटवर्क (Jio Network Down) बंद आहे. याबाबत ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत.

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात Jio Network Down, तांत्रिक कारणांमुळे कॉलिंग, इंटरनेट सेवा ठप्प
Reliance Jio ( प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 6:31 PM

मुंबई : गेल्या तासाभरापासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात रिलायन्स जियोचं (Reliance Jio) नेटवर्क ठप्प आहे. 12.15 वाजल्यापासून जिओचं नेटवर्क (Jio Network Down) बंद आहे. याबाबत ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे सेवा बंद झाल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीचं काम करत असून लवकरच सेवा सुरळीत होईल, असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. जियोचं नेटवर्क ठप्प असल्याने कॉलिंग आणि इंटरनेट सेवा बंद झाली आहे. याचा जियोच्या (Jio) ग्राहकांना फटका बसत आहे. कंपनीला काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, आणि ठाणे या परिसरामध्ये जियोचं नेटवर्क गायब झाल्याचे बोलले जात आहे.

कंपनीचे कर्मचारी यावर काम करत आहेत. काही तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात आलं आहे. हा प्रॉब्लेम लवकरच दुरुस्त केला जाईल आणि सर्वांच्या मोबाईलवर नेटवर्क असेल, अशी प्राथमिक माहिती कंपनीने दिली आहे.

दुपारी साधारण 12.15 च्या सुमारास जिओचे नेटवर्क डाऊन होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ट्विटरसह सोशल मीडियावर जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याच्या पोस्ट पडू लागल्या. तसेच ग्राहकानी कस्टमर केअरवर कॉल करुन तक्रारी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जियोचे कर्मचारी दुरुस्तीच्या कामाला लागले. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तसेच Reliance jio कडूनही यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, एक तास उलटला असला तरीही जियोची सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही.

नेटवर्कची समस्या

दरम्यान, काही युजर्सच्या मोबाईलवर नेटवर्क येतंय-जातंय अशी समस्यादेखील समोर आली आहे. तर काहींच्या फोनवर गेल्या एक तासापासून नेटवर्क नाही.

इतर बातम्या

सावधान | ऑनलाईन बँकिंग करत असाल तर जरा इकडे लक्ष द्या, आणि आधी तुमचं बँक अकाऊंट चेक करा…

7700 mAh बॅटरी, मोठा डिस्प्ले, Motorola Moto Tab G70 बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात

Free Fire Redeem Codes : ऑनलाईन गेमिंगमधून शानदार रिवॉर्ड्स, कसा करावा क्लेम?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.