AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UdayanRaje Bhosale : 'ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला...', उदयनराजे रायगडावरील 'त्या' समाधीवरून पुन्हा भडकले

UdayanRaje Bhosale : ‘ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला…’, उदयनराजे रायगडावरील ‘त्या’ समाधीवरून पुन्हा भडकले

| Updated on: Apr 11, 2025 | 12:26 PM
Share

‘कोण वाघ्या कुत्रा? एकच वाघ होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज’, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी वाघ्या कुत्र्याच्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील वादावर गेल्या काही दिवसांपूर्वी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी यावर भाष्य केले आहे.

किल्ले रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरुन अद्याप वाद सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच खासदार उदयनराजे भोसले यांनी सध्या सुरु असलेल्या वादावर स्पष्ट भूमिका मांडत रोखठोक प्रतिक्रिया दिली. रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या, असंच थेट म्हटलंय तर ऐवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? असा सवाल देखील उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केलाय. “वाघ्या ते कुत्रं बघा, ते इथलं तरी आहे का? लांब कानाचं कुत्रं इंडियामध्ये बघितलंय का? ही ब्रिटिश कुत्री आहे. फेकून टाका, जास्त कौतुक कशाला हवं असं उदयनराजे म्हणाले. ऐवढा काय विचार करायचाय द्यायचा एक दणका, त्यात काय विचार करायचाय, असंही उदयनराजे भोसले म्हणाले. तर मुंबईत अरबी समुद्रात पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच राष्ट्रीय स्मारकाचं भूमीपूजन झालं, असे सांगत असताना मी सुद्धा त्यावेळी तिथे हजर असल्याचे उदयनराजे भोसले म्हणाले. पुढे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं, अशी मागणी करत गर्व्हनर हाऊसची जागा आहे. ही जवळपास 48 एकर जागा आहे. एखाद्या राज्यपालाला रहायला किती जागा लागते?. 48 एकर थोडी जागा नाही. ही जागा अरबी समुद्राला लागून आहे. त्या संदर्भात अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे यावेळी माध्यमांना सांगितले.

Published on: Apr 11, 2025 12:19 PM