Udayanraje Bhosale: पप्पी-झप्पी झाली, केक भरवला, गिफ्टही दिलं; कार्यकर्त्याच्या मुलाचा वाढदिवस अन् उदयनराजेंचं सेलिब्रेशन
Udayanraje Bhosale Satara Video : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा कार्यकर्त्यांसोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहेत. एखाद्या कार्यकर्त्याच्या मुलाला देखील उदयन राजे किती जीव लाऊ शकतात याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सुशील मोझर या कार्यकर्त्याच्या मुलाचा वेदांत मोझर याचा वाढदिवस असल्याने उदयन राजे यांनी त्याची भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या आहेट्. नुसत्याच शुभेच्छाच दिल्या नाही तर केक भरवून त्याला एक पेरफ्यूम देखील गिफ्ट दिला आहे. यावेळी त्याला झप्पी देऊन उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. तसंच वेदांतने नवीन घेतलेल्या थार गाडीमधून देखील उदयनराजेंनी रपेट मारली. यावेळी आपल्या भावना व्यक्त करत उदयनराजेंनी वेदांत मला माझ्या मुलासारखा आहे. माझी मुलंसुद्धा मोठी झाली. पण काहीही झालं तरी मी कायम तुमच्या सोबत असेल हे लक्षात ठेव असं उदयन राजेंनी वेदांतला यावेळी म्हंटलं.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

