Special Report | मराठा आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीसांना घेरलं, पाहा उद्धव ठाकरेंचा आरोप काय ?

Special Report | मराठा आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीसांना घेरलं, पाहा उद्धव ठाकरेंचा आरोप काय ?

मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल केल्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडली नाही, असा विरोधकांकडून आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू केलेला मराठा आरक्षणाचा कायदा हा फुलप्रूफ नव्हता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.  त्याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट..