तेव्हा मिंध्यांना दाढी खेचून आणलं असतं पण… उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असून त्यांची आज कणकवली येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्याआधीच आपल्याला बंडाची चाहूल लागल्याचे त्यांनी म्हटले
मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असून त्यांची आज कणकवली येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्याआधीच आपल्याला बंडाची चाहूल लागली होती. ते म्हणाले, आमदार फुटत आहे, मला काय कळलं नव्हतं? असा सवाल करत मी पण हॉटेलमध्ये डांबून ठेवू शकलो असतो. हे आमदार जात असताना मला कळाले नव्हते का? मिंध्याची दाढी पकडून आणता आले नसते का? पण मी जेवढे सडके आहेत तेवढ्यांना जावू दिलं, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. भाजप हा हुकूमशाही मार्गाने जात आहे. भाजप ज्या दिशेने देश नेत आहे तो मार्ग हुकूमशाहीचा आहे. त्यामुळे तुम्हाला हा मार्ग नको असेल तर भाजपला हद्दपार करा…अब की बार, भाजप तडीपार हा नारा असला पाहिजे, असे म्हणत खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले

