शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली, उद्धव ठाकरेंचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाला जोरदार टोला लगावत शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडल्याचे म्हटले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 23, 2022 | 10:11 PM

मुंबई : ‘दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिलं, आपण दिल्ली काबीज करु’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेची पुढील वाटचाल स्पष्ट केलीय. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आपले 25 वर्षे युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे. याचं कारण राजकारण म्हणजे गजकरण असं बाळासाहेब म्हणायचे. यांना राजकारणाचं गजकरण झालं आहे. राजकारण म्हणून ते आता काही खाजवत आहेत, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें