AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधीच शिवसेनेचं ‘एकला चलो रे?’; बडा नेता म्हणाला, महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता दिसेल

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधीच शिवसेनेचं 'एकला चलो रे?'; बडा नेता म्हणाला, महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता दिसेल
CM Uddhav Thackeray
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 4:04 PM
Share

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच शिवसेनेच्या बड्या नेत्या महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता दिसेल असं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतही तीन पक्षांची आघाडी होणार नसल्याचे संकेत मिळत असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय भाष्य करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना एकला चलो रेचे संकेत दिले आहेत. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे भाष्य केलं. शिवसेनेने मुंबईत केलेलं काम सर्वांना माहीत आहे. त्यामुळे कोण काय बोलतं आणि काय ट्विट करतं याने काही फरत पडत नाही. मुंबईकर आणि शिवसेना हे नातं घट्ट आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता दिसेल, असं देसाई म्हणाले. देसाई यांच्या या विधानाने तर्क वितर्क लढवले जात असून आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. देसाई यांनी हे विधान केल्याने आता राष्ट्रवादीचे काय होणार? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

छुप्या युतीने फरक पडणार नाही

यावेळी त्यांनी भाजप-मनसेच्या छुप्या युतीच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली. मुंबईकरांना अभिमान वाटावा अशी मुंबई निर्माण करण्याचं काम शिवसेनेने केलं आहे. मुंबईकरांच्या बळावरच आम्ही हे करून दाखवलं आहे. मुंबईकर हा सुज्ञ नागरिक आहे. त्यांच्यासाठी कोण झटतो हे मुंबईकरांना माहीत आहे. त्यामुळे कोणी छुपी युती करतं आणि आणखी काय करतं याने काही फरक पडणार नाही. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच आहे, असा दावाही देसाई यांनी केला.

बाकीचे रंग बदलू

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चांवर भाष्य केलं. मुंबईतील भगव्या झेंड्याकडे वाकडी नजर टाकण्याची हिंमत कुणातही नाही. भगवा आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत हे मुंबईकर जाणून आहेत. बाकीचे रंग बदलू आहेत. आज इथे तर उद्या तिथे. निष्ठेने कोण उभा राहत असेल तर तो केवळ भगवा आहे. त्यामुळे मुंबईची जनता कायम शिवसेनेसोबत आहे, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं.

लय मजबूत शिवसेनेचा किल्ला

यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आम्ही कडवट शिवसैनिक आहोत. कितीही करा हल्ले, लय मजबूत शिवसैनेचे किल्ले, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

विरोधकांचं काम जनतेला भरकटवणं, मुख्यमंत्री लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार: आदित्य ठाकरे

Mumbai Rain : अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या, वाहनावरं पांढऱ्या पावडरची चादर, मुंबईकरांची चिंता वाढली?

Balasaheb Thackeray Jayanti: बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती; राऊतांचा हल्लाबोल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.