AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा राज्यावर मोठं संकट, 7 जिल्ह्यांमध्ये थेट अलर्ट, अवकाळीचा कहर, पुढील 24 तास…

राज्यातील तापमानात चढउतार होत असतानाच भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. आज राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. थेट येलो अलर्ट जारी करण्यात आला.

पुन्हा राज्यावर मोठं संकट, 7 जिल्ह्यांमध्ये थेट अलर्ट, अवकाळीचा कहर, पुढील 24 तास...
Maharashtra Weather
| Updated on: Feb 23, 2026 | 7:25 AM
Share

राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच काही शहरांमधील प्रदूषण प्रचंड वाढले. हवा दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. मुंबईमधील वायू प्रदूषण प्रचंड वाढलंय. कधी उन्हाळा, कधी थंडी तर मध्येच अवकाळी पाऊस अशी स्थिती राज्यात आहे. राज्यात काही दिवसांपूर्वीच मोठा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले शेतकऱ्यांचे सर्व पिक वाहून गेले. केंद्र शासनाकडून झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात राज्यातून थंडी गायब झाली पण अजूनही पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. वर्षभर राहिल्या सारखा यंदा पाऊस राहिल्याचे दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा आज अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील इतरही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज अवकाळी पाऊस हजेरी लावेल. यादरम्यान जोरदार वारेही सुटेल. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले.

नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. यासोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 11.6 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मुंबईतील सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे 36.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

दुपारी उन्हाचा चटका बसत असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज लावण्यात आला. अवकाळी पाऊस आल्यानंतर वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहेत. शिवाय आज दिवसभर राज्यातील बहुतेक ठिकाणी सातत्याने तापमानात चढउतार हा बघायला मिळेल. देशातील इतर राज्यात जोरदार पाऊस होताना दिसत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...