नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही, उद्धव ठाकरे यांची टीका
आम्हाला न्यायालयावर विश्वास नाही असे अजिबात नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.परंतू आमची केस दोन वर्षे झाले तरीही निकाला अभावी सर्वोच्च न्यायालयातच पडून आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतल्याने देशभरातून टीका करण्यात आली आहे. याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला.उद्धव ठाकरे म्हणाले मी उलट सरन्यायाधीशांचे आभार मानतोय की नशीब मोदी येणार आहेत, म्हणून त्यांनी गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही. दोन वर्षांपासून आमचा खटल्याची तारीख कधी पासून सुरु होतोय याची आम्ही वाट पाहातोय. आता आम्हाला जनतेच्या न्यायालयावरच विश्वास असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Latest Videos
Latest News