आम्ही भाडोत्री लोकांच्या जीवावर आम्ही नाहीये; राऊतांचा शिंदे गटावर हल्ला
उद्धव ठाकरे गटाचे खासदार खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी ज्यांचे हात बरबटलेले आहे तेच शिंदे सोबत जात आहेत अशी टीका दीपक सावंत आणि भूषण देसाई यांच्यावर केली
सिधुदुर्ग : उद्धव ठाकरे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी प्रवेश केला. त्यानंतर अनेकांनी भूषण देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तर भाजपमधील काही नेत्यांनी खुली नाराजी व्यक्त करत त्यांचे हात बरबटलेले असे म्हटलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी ज्यांचे हात बरबटलेले आहे तेच शिंदे सोबत जात आहेत अशी टीका दीपक सावंत आणि भूषण देसाई यांच्यावर केली. दीपक सावंत, भूषण देसाई यांचे हात बरबटलेले. ते आमच्याबरोबर निस्वार्थी लोक आहेत. दीपक सावंत आणि भूषण देसाई यांच्यासारखे मिंधेपणा करून जात असतील. आम्ही नाही, आमच्यासारखे करोडो लोक हे या संपूर्ण शिवसेनेला वाहून घेऊन जातील. आम्ही भाडोत्री लोकांच्या जीवावर नाही असा घणाघात देखील राऊत यांनी केला. राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

