Sanjay Raut यांनी मराठा आंदोलनावरून शिंदे सरकारला फटकारलं; म्हणाले, ‘… गंडवागंडवी करू नका’
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरून शिंदे सरकारवर केला हल्लाबोल, म्हणाले, 'मनोज जरांगे गुंडाळलं जाणारं व्यक्तिमत्व नाही'
मुंबई, ७ सप्टेंबर २०२३ | मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. राऊत म्हणाले, भ्रष्टाचाराप्रकरणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आणि महाराष्ट्रात आंदोलन केलं त्यावेळी गिरीश महाजन मध्यस्थी करायला मध्ये होते. पण काहीही निश्पन्न झालं नाही तर ते फक्त अण्णांना गुंडाळून आले. मात्र मनोज जरांगे गुंडाळलं जाणारं व्यक्तिमत्व नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुढे ते असेही म्हणाले, मनोज जरांगे पाटील हा फकीर माणूस आहे. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं. या साध्या माणसाने समाजाच्या प्रश्नावर राज्य सरकारला जेरीस आणलंयं. ते झुकणार नाहीत. त्यामुळे ही गंडवागंडवी इथे करू नका. हे आंदोलन गुंडाळलं जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

