उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार? संजय राऊत यांच्या भेटीनंतर अभिजित पानसे काय म्हणाले?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे गट आणि मनसैनिकांनी या दोन्ही नेत्यांना आवाहन करत बॅनरबाजीही केली. ही बॅनरबाजी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे. मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे गट आणि मनसैनिकांनी या दोन्ही नेत्यांना आवाहन करत बॅनरबाजीही केली. ही बॅनरबाजी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे. मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी राऊत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

