Bhaskar Jadhav Video : भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, ‘क्षमतेप्रमाणे मला काम…’,ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील एकमेव आमदार नाराज?
शिवसेनेचं ऑपेरशन टायगर सुरू असतानाच ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या मनात धडकी भरवणारी आहे.
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरची घोषणा करत एका मागून एक प्रवेश शिंदेंच्या शिवसेनेत होतील. त्यातही जुने सहकारी आपल्यासोबत येतील, असा मोठा दावा त्यांनी केला होता. अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील माजी आमदार राजन साळवी यांनी नुकतीच ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर कोकणात ठाकरेंचा एकमेव आमदार भास्कर जाधव उरल्याची चर्चा सुरू झाली. ऑपरेशन टायगर सुरू असतानाच, भास्कर जाधवांचा मोठा बॉम्बगोळा टाकत क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव असल्याचे वक्तव्य केलंय. त्यामुळे आता भास्कर जाधव नाराज आहे का? अशा नव्या चर्चा सुरू झाल्यात. बाळासाहेब ठाकरे असताना शिबिरांमधून भाषण करायची मला संधी मिळायची. महाराष्ट्रात जनतेशी संवाद साधताना कोणतीही लबाडी, खोटेपणा नसतो त्यामुळे लोकांना ते भावतं. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला आडवं आलं, त्याची अनेक कारणं आहेत, अडचणी अनेक येतात पण महाराष्ट्रात मला मानणारा एक वर्ग तयार झालाय. याचं माझ्यासारख्या समान्य माणसाला अप्रूप आहे, असं म्हणत भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

