आधी हल्लाबोल अन् आता धनंजय मुंडेंचीच घेतली भेट, सुरेश धसांची गुप्त सेटिंग? भेटीचं कारण काय?
सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मुंडेंवर आकाचे आका असं म्हणत धस यांनी हल्लाबोल केला आणि आता धस मुंडेंच्या भेटीला गेल्याने विरोधकांनी सेटिंगवरून शंका घेतलीये.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तुटून पडणारे भाजपचे नेते सुरेश धस मंत्री धनंजय मुंडेंना भेटले. चार ते पाच दिवसांआधी जवळपास साडेचार तास धस आणि मुंडेंमध्ये चर्चा झाली. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल करणारे सुरेश धसच मुंडेंच्या घरी गेल्याने भुवय्या उंचावणं स्वभाविक आहे. धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झालाय त्यामुळे तब्येतीच्या विचारपूस करण्यासाठी गेलो विचारपूस वेगळी आणि लढा वेगळा असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे. दरम्यान, निषेध मोर्चामधून सुरेश धस महायुतीचेच मंत्री असलेल्या धनंजय मुंडे अँड गँग असा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधत होते. पण तेच सुरेश धस मुंडेंच्या घरी गेल्याने प्रकरण निपटवण्याचा किंवा राजकीय सेटिंगचा प्रयत्न आहे का असा सवाल जरांगेनपासून दमानिया यांनी ही केलाय. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी करून दिलीये. साडेचार तास सोबत होतो धस आणि मुंडेंमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीये. हेही बावनकुळे सांगायला विसरले नाही. आका म्हणजे वाल्मिक कराड आणि आकाचे आक्का म्हणजे धनंजय मुंडे अशी टीका करत सुरेश धस यांनी आरोपाची राळ उठवली होती. इतकंच नाही तर अजित दादा विनंती करतो म्हणत यांना मंत्रिमंडळातून काढा हेही सुरेश धसच म्हणाले होते. पण आता दोघांची भेट झाल्याने विरोधकांच्या मनात धस यांच्याबद्दल सेटिंगची शंका निर्माण झालीये.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
