Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर विविध राजकीय नेत्यांकडून अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

या संवादादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल दिपके कुटुंबाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी उभारलेल्या लढ्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या दूरध्वनीवरून उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
दरम्यान, यापूर्वी मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनीही अभिजित दिपके यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन आंदोलनाच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. या भेटी आणि संवादांमुळे आंदोलनानंतरच्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, विविध पक्षांकडून अभिजित दिपके यांच्या भूमिकेची दखल घेतली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Published on: Jul 31, 2026 03:14 PM
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...