CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणला रवाना LIVE
काल महाडमधील तळीये गावची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून चिपळूणकडे रवाना झाले आहेत.
काल महाडमधील तळीये गावची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून चिपळूणकडे रवाना झाले आहेत. यावेळी ते पूरग्रस्त भागाची पाहणी करतानाच स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. तसेच अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (CM Uddhav Thackeray went to inspect flood situation in Chiplun)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 10 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने चिपळूणसाठी रवाना झाले आहेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे 11 वाजता पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी 12.20 वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी 2.40 वाजता अंजनवेलहून हेलिकॉपटरने मुंबईकडे रवाना होतील.
Published on: Jul 25, 2021 10:45 AM
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन

