उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता औरंगाबादकडे रवाना होणार
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेकडं राज्यभराचं लक्ष लागून आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी शिवसेना नेते औरंगाबादेत ठाण मांडून बसले आहेत.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेकडं राज्यभराचं लक्ष लागून आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी शिवसेना नेते औरंगाबादेत ठाण मांडून बसले आहेत. मुख्यमंत्र्यांची ही सभा रेकॉर्डब्रेक होणार, असा दावाही शिवसेनेकडून करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या सभास्थळी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा स्टेजच्या एका बाजूला ठेवण्यात आला आहे. तसेच सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत असल्यानं संभाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
Published on: Jun 08, 2022 01:42 PM
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

