UdyanRaje Bhosale | मेहरबानी करा माझी कोणी जिरवू नका, मी कोणाचा दुश्मन नाही : उदयनराजे भोसले
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची नोटीस आली आहे. याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारणा केली. त्यावेळी ही बाबत न्यायप्रविष्ठ असल्यामुळे माहिती देता येणार नसल्याचं पत्र जिल्हा बँकेकडून उदयनराजेंना पाठवण्यात आलंय.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची नोटीस आली आहे. याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारणा केली. त्यावेळी ही बाबत न्यायप्रविष्ठ असल्यामुळे माहिती देता येणार नसल्याचं पत्र जिल्हा बँकेकडून उदयनराजेंना पाठवण्यात आलंय. त्यानंतर उदयनराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. ही बँक गरीब शेतकरी सभासदांची आहे ती राहू द्या. त्यांची जिरवू नका, ही विनंती, असं उदयनराजे हात जोडून म्हणाले.
अनेकांना वाटत असेल की मला मस्ती आलीय. मेहरबानी करा माझी कुणी जिरवू नका. मी कुणाचा दुश्मन नाही. ही बँक गरीब शेतकरी सभासदांची आहे. ही बँक राहूद्या. त्यांची जिरवू नका ही विनंती. ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठे जायचं. कुठल्याही परिणामांना मी घाबरत नाही. व्हायचं ते होऊ द्या, असं उदयनराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

