Ulhasnagar | उल्हासनगरात चोरट्यांनी मेडिकल शॉप फोडले, 95 हजाराचा मुद्देमाल चोरीला
उल्हासनगरच्या कॅम्प चारमधील आंबेडकर चौकात गुरुकृपा मेडिकल हे दुकान आहे. या दुकानात शनिवारी पहाटे तिच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केली. सुरुवातीला दुकानासमोर एक रिक्षा येऊन उभी राहिली. त्यानंतर चोरट्यांनी शटर वाकवून दुकानात प्रवेश केला आणि मेडिकलमध्ये असलेली 95 हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
ठाणे : उल्हासनगरच्या कॅम्प चारमधील आंबेडकर चौकात गुरुकृपा मेडिकल हे दुकान आहे. या दुकानात शनिवारी पहाटे तिच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केली. सुरुवातीला दुकानासमोर एक रिक्षा येऊन उभी राहिली. त्यानंतर चोरट्यांनी शटर वाकवून दुकानात प्रवेश केला आणि मेडिकलमध्ये असलेली 95 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. चोरीची ही घटना दुकानाबाहेरील चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेतायत. दरम्यान, उल्हासनगरात काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीनं दुकानासमोर रिक्षा लावून वाईन शॉपमध्ये चोरी करण्यात आली होती. त्यामुळं रिक्षा आडवी लावून चोरी करणारी ही नवीन एखादी टोळी उल्हासनगरात सक्रिय झाली आहे का? याचा पोलिसांनी शोध घेणं गरजेचं आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

