Girish Mahajan : शिक्षकांच्या आंदोलनाला यश, मंत्री गिरीश महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत…
शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्याची घोषणा करताना मंत्री गिरीश महाजन यांनी समस्त शिक्षकांना आश्वस्त केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचेही महाजन यांनी म्हटले.
मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन प्रामुख्याने विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी वाढीव अनुदान मिळावं या मागणीसाठी आहे. दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शिक्षकांकडून देण्यात आल्यानंतर या आंदोलनात आता मंत्री गिरीश महाजन यांनीही हजेरी लावली आहे. विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात 20 टक्के वाढीव पगार जमा होईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं. यामुळे आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश आल्याचे पाहायला मिळत आहे. पुढे ते असेही म्हणाले की, ‘आता तुमच्या पगाराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. तुमच्या शिक्षकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे ठरलं की दोन-तीन दिवसात सर्व तांत्रिक बाजू समजावून घेऊन, येत्या 18 तारखेला अधिवेशन संपल्यावर तुमच्या खात्यात पैसे आलेले असतील. यात कोणताही बदल होणार नाही.’
Published on: Jul 09, 2025 08:05 PM
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
