छगन भुजबळांच्या जीवाला धोका, पुन्हा धमकी; मेसेज-फोनमध्ये काय म्हटलंय?
छगन भुजबळ यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने मेसेज आणि फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणी जालन्यातील अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची पुन्हा धमकी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मंत्री छगन भुजबळ यांना फोन आणि मेसेज द्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर या धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मंत्री छगन भुजबळ यांना मोबाईलवर मॅसेज करत अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर संबंधित घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणी नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
Latest Videos
Latest News