Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यभरात सतर्कतेचा इशारा
Rain Alert In Maharashtra : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलेलं बघायला मिळत आहे. पुढचे 2 दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलेलं बघायला मिळत आहे. या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, पिकांना फटका बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातल्या इतर ठिकाणांना हवामान खात्यांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई व आसपासच्या शहरांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. तर पुढचे दोन दिवस देखील राज्यात यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची हजेरी या लागणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मात्र चांगलाच फटका बसलेला आहे. शेती पिकांबरोबरच फळबागांना देखील या पावसाने मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?

