Vaishnavi Hagawane : मी माझी ड्युटी करतोय… हगवणे कुटुंबाच्या वकिलानं टीका झाल्यानंतर नेमकं काय म्हटलं?
'वैष्णवी हगवणेचा नको त्या वयात मृत्यू झाला. तिला बाळ आहे.. याचं मला वाईट वाटतंय', असं हगवणेचे वकील विपुल दुशिंग यांनी म्हणत आपलं स्पष्टीकरण दिलंय.
वैष्णवी हगवणे प्रकरणी वैष्णवीचा पती, दीर सासू, सासरा आणि नणंद यांना बेड्या ठोकल्यात. बुधवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, यावेळी झालेल्या युक्तिवादावेळी हगवणेचे वकील विपुल दुशिंग यांनी हयात नसलेल्या वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला. इतकंच नाहीतर वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅटिंग करत होती असा दावाही केला होता. दुशिंग यांनी मांडलेल्या आरोपीच्या बाजुमुळे आणि या दाव्यामुळे समाजातून संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. ‘मी वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर बोट ठेवले नाही. तर हगवणे कुटुंबाची बाजू मांडल्याने माझ्यावर टीका होतेय. माणूस म्हणून वैष्णवीसाठी वाईट वाटतंय पण मी माझी ड्युटी करत आहे’, असे हगवणेचे वकील विपुल दुशिंग यांनी म्हटलंय.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

