Vaishnavi Hagawane : हगवणेंचा आणखी एक प्रताप, वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेच्या अडचणी वाढणार अन् सासूवर…
25 लाख रुपयांमध्ये जेसीबीचा सौदा ठरला होता. त्यानुसार प्रशांत एळवंडे यांनी सुरुवातीला 5 लाख रुपये शशांक याला दिले. बँकेचे हफ्ते भरण्यासाठी दरमहा 50 हजार रुपये शशांकला ते देत होते. मात्र शशांकने हफ्ता भरला नसल्याने बँकेने जेसीबी जप्त केला. शशांकने हा जेसीबी सोडवून आणला, मात्र प्रशांत यांनी दिलेले पैसे परत केले नाहीत.
हगवणे कुटुंबातील आणखी एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. यामुळे हगवणे कुटुंबातील वैष्णवीचा पती आणि सासू यांचा पाय आणखी खोलात जाण्याची चर्चा आहे. वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून त्याच्यासह वैष्णवीची सासू लता हगवणे हिच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात येत आहे. शशांकने जेसीबी व्यवहारात 11 लाख 70 रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप होतोय. प्रशांत येळवंडे यांनी हा गंभीर आरोप शंशाक हगवणेवर केलाय. बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचाही आरोप यावेळी शशांकवर करण्यात आला आहे.
या प्रकरणात आता महाळुंगे चाकण इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर वैष्णवी मृत्यू प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली असून वैष्णवीचा पती, सासू आणि नणंदेची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टानं त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर वैष्णवीचा सासरा आणि दीर पोलीस कोठडीत असून 31 मे पर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत

