Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी आणि मयुरीचे कुटुंबीय tv9 मराठीवर; दोन्ही कुटुंबांकडून हगवणे कुटुंबाबद्दल मोठे खुलासे
Vaishnavi Hagawane Death Case Updates : वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबातल्या सूनांचा होणारा छळ समोर आला आहे. हगवणे यांच्या मोठ्या सुनेला देखील अशाच प्रकारे त्रास देण्यात आला होता.
पुण्यात वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. केवळ हुंड्यासाठी एका नेत्याने सुनेचा छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचलल आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत. या घटनेनंतर स्वत: अजित पवार यांनी प्रकरणाचं गांभीर्य पाहून हगवणे यांना पक्षातून काढलं आहे. मात्र जमीन खरेदीसाठी माहेरून 2 कोटी रुपये आणण्याच्या मागणीसाठी वैष्णवीचा छळ सुरू होता. विशेष म्हणजे वैष्णवीने राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक याच्याशी घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केलेला होता. लग्नात देखील वैष्णवीच्या वडिलांनी कोट्यवधी रुपयांचा हुंडा हगवणे कुटुंबाला दिला होता. असं असूनही तिचा आणखी हुंड्यासाठी छळ सुरू होता. या प्रकरणानंतर वैष्णवीची मोठी जाऊ मयूरी जगताप हिने देखील आपल्यावरील झालेल्या अत्याचाराच्या वेदनादायी घटना आता सांगितल्या आहेत. त्यामुळे हगवणे कुटुंबाकडून केवळ पैशांसाठी सुनांचा होणारा अमानुष छळ सगळ्यांसमोर उघडा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात टीव्ही9 मराठीने मयूरी जगताप आणि वैष्णवी हगवणे या दोघींच्या आई-वडिलांशी एकत्रित संवाद साधला आहे. त्य मुलाखतीचा हा स्पेशल रिपोर्ट..