Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीकडून 2 वर्षांपूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न, कीटकनाशक पिऊन… मोठा पुरावा पोलिसांच्या हाती
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतरही सासऱ्याचा निर्लज्जपणाचा कळस पाहायला मिळाला. फरार असताना हगवणे पिता-पुत्रांचा वैष्णवीच्या मृत्यूनंतर सात दिवस राजेशाही थाट पाहायला मिळाला.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात नव-नवी माहिती पोलिसांच्या तपासातून उघड होत आहे. अशातच वैष्णवीने दोन वर्षापूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २७ नोव्हेंबर २०२३ रोजीच वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांना एका खासगी रूग्णालयाकडून वैष्णवी हगवणेच्या उपचारांची कागदपत्र मिळाली आहेत. यापूर्वी वैष्णवीने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वैष्णीच्या घरच्यांकडून लग्नात देण्यात आलेलं तब्बल ५१ तोळं सोनं बँकेकडे गहाण ठेवण्यात आलं असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी पुण्याच्या बावधान पोलिसांकडून वैष्णवीचा पती, सासरा, आणि सासूची चौकशी सुरू आहे.
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?

