Nilesh Chavan : नरकात जरी गेला असता तरी त्याला; निलेश चव्हाणच्या अटकेवर रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला अटक करण्यात आलेली असून त्यावर आता रुपाली ठोंबरे पाटील आणि रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला पकडलं असतं असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हंटल आहे. तर निलेश चव्हाणला मदत करणाऱ्याला सह आरोपी करा आधी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे. गुन्हा सीआयडीकडे वर्ग करा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला आज नेपाळमधून अटक केली आहे. मृत वैष्णवीचं बाळ करिश्मा हगवणे हिने निलेशकडे दिलेलं होतं. हे बाळ आणण्यासाठी वैष्णवीचं कुटुंब गेलं असताना निलेश याने त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं होतं. यानंतर निलेश फरार होता. त्याच्याबद्दल पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी तपास करताना समजल्या आहेत. अखेर आज त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्या अटकेनंतर रुपाली ठोंबरे पाटील आणि रोहिणी खडसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

