मुंबईत वीरप्पन गॅंग? कुणाची आणि काय आहे घोटाळा? काय आहे मनसेचा आरोप

महेश पवार, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 21, 2023 | 11:14 AM

भाजप नेते किरीट सोमय्या हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे एकामागोमाग एक घोटाळे बाहेर काढत आहेत. त्यापाठोपाठ आता मनसेनेही इशारा दिला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक ( NAWAB MAILK ), अनिल देशमुख ( ANIL DESHMUKH ), शिवसेना खासदार संजय राऊत ( SANJAY RAUT ), माजी मंत्री अनिल परब ( ANIL PARAB ) ही भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावरची नेते मंडळी. सोमय्या पाठोपाठ आता मनसेनेही वीरप्पन गॅंगचे घोटाळे सोमवारी जाहीर करणार असल्याचा इशारा दिला आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कोरोना काळात जनतेची कशी लूट करण्यात आली याचे पुरावे सादर करण्याचा इशारा दिला आहे. हा घोटाळा करणाऱ्यांना देशपांडे यांनी वीरप्पन गॅंग असं म्हटलं आहे.

आपल्या शाखेत एक इसम आला होता. त्याने काही कागदपत्रे आणि पेन ड्राइव्ह दिला होता. तो पाहिल्यावर हा प्रचंड मोठा घोटाळा असून कशा प्रकारे जनतेची लूट केल्याचे लक्षात आले. या वीरप्पन गॅंगमधील लोकांची नावे सोमवारी २३ जानेवारीला जाहीर करणार आहे असा इशारा त्यांनी दिलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI