Pune Video : पुण्याच्या शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका, मराठा कार्यकर्ते आक्रमक, व्हिडीओ व्हायरल होताच…
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शिवसृष्टीच्या मुख्य गेटसमोर चारचाकी वाहन उभी असल्याचे दिसत आहे. यावेळी एका राखाडी रंगाच्या गाडीजवळ एक वयस्कर व्यक्ती सूचना फलकावर लघुशंका करताना दिसत आहे, तर एक महिला मोबाईल हातात घेऊन तिथेच उभी असल्याचे दिसतंय.
पुण्यातील आंबेगाव परिसरात असणाऱ्या शिवसृष्टीच्या गेटवर एका व्यक्तीने लघुशंका केली या व्यक्तीचा लघुशंका करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीचे नाव अमोल अरूण कुलकर्णी असे असल्याचे समोर येते तर अमोल कुलकर्णी याच्या पत्नीवरही भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर पुण्यातील या घटनेनंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र असलेल्या स्मारकावरील सूचना फलकावर या व्यक्तीने लघुशंका केली.
पुणे येथील शिवसृष्टी या ठिकाणी कुलकर्णी नावाच्या समाजकंटकाने लघुशंका करून तमाम महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासला आहे
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला सदर इसम मराठा सेवकांनी तसेच सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पकडून पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे
चोप दिला पाहिजे होता pic.twitter.com/UlFuAOPosK— मराठा Empire🚩 (@maratha_marathi) May 31, 2025
Published on: May 31, 2025 01:05 PM
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
