Devendra Fadnavis | पवारांचं आवाहन योग्यच पण दौरेही महत्त्वाचे : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीवर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आवाहनाचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की, रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य आपल्यामुळे थांबता कामा नये. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण विरोधी पक्षनेता म्हणून जो काही दौरा आहे तो मी येत्या 3 दिवसांत करणारचं आहे', असं फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्याबाबत माध्यमांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, फडणविसांनीही पवारांचा सल्ला योग्य असल्याचं सांगत आपला दौरा मात्र सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलंय

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI